अच्छे दिन कधी येणार ?” दोडामार्ग शिवसैनिकांनी दिले निवेदन*

अच्छे दिन कधी येणार ?” दोडामार्ग शिवसैनिकांनी दिले निवेदन*

कुडाळ /-

पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या या मागणीसाठी दोडामार्ग तहसिलदार यांना शिवसेना दोडामार्गच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यात निदर्शने होत असताना दोडामार्गातही निदर्शने करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा प्रखर निदर्शने करण्यात येतील असा इशारा बाबुराव धुरी तालुकाप्रमुख दोडामार्ग यांनी दिला, अच्छेदिन भुलभुलैया असल्याचे सांगत सामान्यांचे कंबरडे मोडल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश प्रसाद गवस, उप सभापती धनश्री गवस, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, युवासेना समन्वयक मदन राणे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, महिला आघाडी प्रमुख श्रेयाली गवस, उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, गुरुदास सावंत, दादा देसाई, सज्जन धाऊसकर, आत्माराम मेस्त्री, रामदास मेस्त्री, सुरेखा लोंढे, भिवा गवस, प्रसाद कुडास्कर, आनंद धाऊसकर,भगवान गवस, महादेव कासार, विवेक एकावडे आदी होते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..