कुडाळ येथे २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आ.वैभव नाईक यांच्याहस्ते उद्घाटन..

कुडाळ येथे २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आ.वैभव नाईक यांच्याहस्ते उद्घाटन..

कुडाळ /-

प्रिन्स स्पोर्ट्स क्लब,समादेवी मित्र मंडळ कुडाळ,कलेश्वर मित्र मंडळ नेरूर यांच्यावतीने कुडाळ क्रीडांगण येथे आयोजित केलेल्या २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहाळा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी रणजी क्रिकेटपटू नरेश चुरी व इतर मान्यवर उपस्थित होते. कुडाळ तालुक्यातील क्रिकेट पट्टूसाठी मैदान बनवून दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचा यावेळी स्पोर्ट क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समादेवी मित्र मंडळ व नेरूर कलेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते गेली २९ वर्षे सातत्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आहेत. हि कौतुकाची बाब आहे. कुडाळ शहर झपाट्याने वाढत आहे. यासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचे काम आपण करायचे आहे. कुडाळ मध्ये अद्ययावत असे क्रीडांगण होत आहे. त्यात काही गोष्टी अपुऱ्या आहेत त्यासाठी पालकमंत्र्यांकडे ५० लाख रु ची मागणी केली आहे. मंडळाच्या आयोजकांनी पैसे काढून आयोजित केलेली महाराष्ट्रातील ही एकमेव क्रिकेट स्पर्धा आहे. यातून खेळावरचे प्रेम दिसून येते. असे सांगत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेबरोबरच लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी जेणेकरून खेळाडूंना राज्यस्तरावर संधी मिळेल असे आवाहन आ.वैभव नाईक यांनी केले.
यावेळी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, डाॅ.संजय निगुडकर, काका कुडाळकर, विकास कुडाळकर, नंदू तावडे, अरविंद शिरसाट,अनंत वैद्य, प्रेमनाथ वालावलकर, संतोष शिरसाट, संजय भोगटे, अभय शिरसाट, बंड्या सावंत, अतुल बंगे, महेश कुडाळकर, नंदू गावडे, सुनील धुरी, डाॅ.जी.टी.राणे, डाॅ.संजीव आकेरकर, डाॅ.संजय केसरे, डाॅ.अमोघ चुबे, शेखर गावडे, समद मुजावर, सचिन कांबळी आदींसह प्रिन्स स्पोर्ट्स क्लब,समादेवी मित्र मंडळ कुडाळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरूर चे कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..