कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदी एक महिन्याच्या आत पूर्ण करा.;आ.वैभव नाईक यांचे तहसीलदारांना आदेश

कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदी एक महिन्याच्या आत पूर्ण करा.;आ.वैभव नाईक यांचे तहसीलदारांना आदेश

जांभवडे व सोनवडे येथील नवनिर्मित तलाठी कार्यालयांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील जांभवडे व सोनवडे येथे नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले असून आज या नवनिर्मित तलाठी कार्यालयांचे उदघाटन आ.वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदीचा आ. वैभव नाईक यांनी आढावा घेतला. कुडाळ तालुक्यातील प्रलंबित फेरफार नोंदी एक महिन्याच्या आत पूर्ण करा असे आदेश आ.वैभव नाईक यांनी तहसीलदारांना दिले. गेली अनेक वर्षे मागणी असलेले तलाठी कार्यालय मंजूर करून दिल्याबद्दल सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार मानले.
कडावल मंडळ अधिकारी यांना महिन्यातून दोन दिवस जांभवडे व घोटगे तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. तलाठी कार्यालय हे गावची शान आहे. एका तलाठी कार्यालयावर अनेक गावांचा भार असल्याने लोकांची कामे रेंगाळत होती. त्याची दखल घेऊन कुडाळ व मालवण मध्ये जास्तीत जास्त तलाठी सजा व मंडळ कार्यालय होण्यासाठी प्रयत्न केलेत. नव्याने मंजूर झालेल्या या तलाठी कार्यालयामुळे लोकांची सातबारा व जमीन विषयक कामे आता सुलभ रित्या होणार आहेत.असे आमदार वैभव नाईक यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी जांभवडे येथे तहसीलदार अमोल पाठक, जि. प.सदस्य लॉरेन्स मान्येकर, मंडळ अधिकारी बी. एन शिंदे, तलाठी व्ही आर कांबळी, शिवसेना विभागप्रमुख विकास राऊळ, सरपंच अर्चना मढव, पं. स. सदस्य बाळकृष्ण मढव, भरणी उपसरपंच निशांत तेरसे, समीर गावकर, तेजस भोगले, मारुती चव्हाण, मारुती पालव, सुचित्रा कुलकर्णी, मधुकर कदम, शुभदा पतियाने, सुरेश पवार, गोविंद सावंत, प्रवीण मढव, रॉनी डिसोझा, आदी उपस्थित होते.
तर सोनवडे येथे सरपंच उत्तम बांदेकर, उपसरपंच वामन गुरव, गुरुनाथ मेस्त्री, काशीराम घाडी, दीपक घाडी, रुपेश घाडी, मोहन घाडी, आत्माराम पवार, शरद गुरव, वामन गुरव, विलास पिरवले, वामन घाडी, शंकर पवार प्रमिला सावंत, महादेव मोरये, अरुण गुरव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..