शेतकऱयांना केलेली मदत मागे घेणारे जगातलॆ एकमेव भाजप सरकार- आ. वैभव नाईक

कुडाळ /-

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी कुडाळ येथे भव्य निषेध मोर्चा काढत आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीबद्दल निषेध करण्यात आला. या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखा ते कुडाळ तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेले पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत पत्र कुडाळ तहसीलदारांना देण्यात आले.
याप्रसंगी पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो..!, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव..!, मोदी सरकार हाय हाय..!, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे…! अशा घोषणांनी कुडाळ शहर परिसर दणाणून गेला होता.
*यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,* गेल्या पाच वर्षात अनेकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. कोविड काळात देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. अनेकांचे रोजगार गेलेत. व्यवसाय बंद झालेत. असे असताना देखील गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सगळयाच वस्तूमध्ये महागाई वाढली आहे. मात्र मोदीसरकार डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. त्यांच्या डोळ्यावरची पट्टी अशा आंदोलनातून आपल्याला उतरवायची आहे. देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत त्यांना दहशतवादी ठरविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. देशातील जनतेच्या विरोधाला मोदी सरकार जुमानत नाही. या दरवाढीवरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी राम मंदिरासाठी पैसे गोळा केले जात आहेत. गॅस दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यासाठीची सबसिडी बंद करण्यात आली. किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱयांना केलेली मदत भाजप सरकारकडून मागे घेण्यात आली. सिंधुदुर्ग मधील २५०० शेतकऱ्यांकडून पैसे पुन्हा वसूल केले जात आहेत.एकदा केलेली मदत मागे घेणारे जगातलॆ हे एकमेव भाजप सरकार आहे. हे निषेधार्थ आहे अशी टीका यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली आहे.
आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे,जि. प. गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका संघटक बबन बोभाटे, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळ उपसभापती जयभारत पालव,शहरप्रमुख संतोष शिरसाट, विकास कुडाळकर,अतुल बंगे,मालवण शहरप्रमुख बाबी जोगी,नगरसेवक मंदार केणी, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,सुशील चिंदरकर, मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, संजय भोगटे,श्वेता सावंत, दीपा शिंदे,राजू जांभेकर,मंदार गावडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page