आचिरणे माळरानावर मोटारसायकल बेचिराख..

आचिरणे माळरानावर मोटारसायकल बेचिराख..

वैभववाडी /-

मोटर सायकल चालवीत असताना बॅटरी मध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला यामध्ये मोटर सायकल अक्षरशा जळून बेचिराख झाली. या घटनेची फिर्याद प्रवीण मनोहर महाडिक वय वर्ष 38 राहणार लोरे संकपाळवाडी याने वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिली. ही घटना 30 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
फिर्यादी प्रवीण महाडिक यांच्या मालकीची हिरो पॅशन प्रो कंपनीची एम .एच.07,एके-9973 मोटार सायकल लोरे येथून आपला मित्र सचिन काळे यांच्या घरी आचिरणे धनगरवाडा येथे काही कामानिमित्त गेले होते .काम आटपून पुन्हा ते घरी येत असताना आचिरणे गावातील माळरानावर मोटरसायकल च्या बॅटरी मध्ये शॉट सर्किट होऊन गाडीने पेट घेतला .आग विझविण्यासाठी प्रयत्न केला परंतु काही वेळातच संपूर्ण मोटार सायकल जळून खाक झाली .दरम्यान या घटनेची फिर्याद वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिली. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला.अधिक तपास पोलीस नाईक जी.एम.तळेकर करीत आहेत.

अभिप्राय द्या..