वेंगुर्ला /-

वेगुर्ले तालुक्यातील श्रीरामवाडी (मेढा निवती ) येथील रहिवाशी सौ. शारदा अंकुश निवतकर 65 हीचे शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात ऊपचार सुरु असताना निधन झाले. निवती श्रीरामवाडी येथील मत्सव्यवसायिक अंकुश निवतकर यांची ती पत्नी तर
दै.तरुण भारतच्या कुडाळ कार्यालयातील कर्मचारी भगवान ऊर्फ दादा निवतकर यांची आई होय.
सोमवारी सांकाळी तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी तीचा कोरोना अहवाल पाँजिटीव आला होता. आज दुपारी निधन झाले. पश्चात पती. तीन मुलगे मुली सुना जावई दिर भावजय पुतणे नातवंडे असा मोठा परीवार आहे.
झाराप येथील संजीवनी मेडिकलचे मालक दिनेश निवतकर व प्रताप निवतकर यांची ती आई होत. आकस्मित निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .शुक्रवारी सायंकाळी श्रीरामवाडी येथे अंतसंस्कार करण्यात आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page