वेंगुर्ला तालुक्यात “१००” हून अधिक कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात “१००” हून अधिक कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळी केलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये भेंडमळा १,उभादांडा वरचेमाड १,वेंगुर्ले शहर रामेश्वर मंदिर जवळ १,वेंगुर्ले शहर सातेरी मंदिर जवळ १,
वेंगुर्ले शहर १ (इचलकरंजी वरून आलेली) असे एकूण सकाळी ५ व्यक्ती नवीन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तसेच सायंकाळी आलेल्या अहवालानुसार कोचरा येथे ३ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून यातील २ व्यक्ती आधीच्या पॉझिटिव्ह संपर्कातील असून १ व्यक्ती नव्याने कोरोना पॉझिटिव्ह,तसेच शिरोडा येथे १ व्यक्ती असे एकूण ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
वेंगुर्ले तालुक्यात शहरात आतापर्यंत ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ४१ व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.तसेच तालुक्यात ग्रामीण भागात आतापर्यंत १०१ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ६५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

अभिप्राय द्या..