वेंगुर्ला तालुक्यातील २ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू

वेंगुर्ला तालुक्यातील २ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज ३ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.यामध्ये म्हापण बाजारपेठ १, वेतोरे १,मांडवि शहर १ इत्यादी ठिकाणी ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तसेच शहर मध्ये सातेरी मंदिर नजीक रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय महिला व निवती श्रीरामवाडी येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.या दोन्ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट होत्या.त्यांना दम्याचा त्रास होता.दरम्यान तालुक्यातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..