कोवीड काळात समाजातील सर्व सामान्य लोकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रोटरी क्लब पणजी चे डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर प्रतिनिधी सुभाष साजने यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त हाॅटेल हिलरूफ कुडाळ येथील कार्यक्रमात केले. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा 27 वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष ओंकार तेली, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चा असिस्टंट गव्हर्नर सिताराम उर्फ दादा कुडतरकर व प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने, सेक्रेटरी अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, सर्व माजी अध्यक्ष, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा पल्लवी बोभाटे, पी डी सी डॉ सायली प्रभू व सर्व सदस्या, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे सेक्रेटरी डॉ विद्याधर तायशेटये, मेघा गांगण, अॅड दिपक अंधारी, सौ दिशा अंधारी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिटटाऊन राजेश घाटवळ, संजय पुनाळेकर, आनंद बांदेकर, दादा साळगावकर, इनरव्हिल क्लब वेंगुर्ला अध्यक्षा गौरी मराठे, कडाळ हायस्कूलचे संस्थाचालक अरविंद शिरसाठ, सुरेश चव्हाण, आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी गेल्या 26 वर्षातील रोटरी अध्यक्षांचा सत्कार, रोटरी स्वाद पाककला स्पर्धा व सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचा बक्षिस वितरण, रोटरी सदस्यांच्या शैक्षणिक यश संपादित केलेल्या मुलांचा सत्कार, द रोटरी फाऊंडेशन ला निधी देणा-या रोटरी सदस्यांचा सत्कार, करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या काॅनबॅकचे मोहन होडावडेकर, लघुपट निर्मिती करून आंतरराष्ट्रीय लघुपटात निवड झालेले प्रसिध्द फोटोग्राफर अनिल पाटकर व स्माईल ट्युब चॅनेलच्या लेखिका सौ समिरा प्रभू यांचा रोटरी होकेशनल अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.