ठेकेदार गौतम व सलिम शेख यांना आरसीसी नाला बांधकाम करण्याच्या खा. राऊत यांच्या सुचना..
कुडाळ तालुक्यातील कसाल न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हजारो विद्यार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा रस्त्याची समस्या भेडसावत असल्याने रस्ता क्रॉस करताना अडचणी येत आहेत. याबाबत आज पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत, दिलीप बिल्डकॉनेचे अधिकारी गौतम, व सलीम शेख, आदीसह उपस्थित होते.
कसाल मध्ये न्यू इंग्लिश स्कूल कसाल एकमेव असे शिक्षण घेण्यासाठी मोठे विद्यालय असल्याने याठिकाणी दशक्रोशीतील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. बाराशे विद्यार्थी पाचवी ते बारावीच्या
वर्गांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. मात्र, नव्याने बनविण्यात आलेल्या महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना महामार्गावरून रस्ता क्रॉस करताना कोणताही पर्याय ठेकेदाराकडून ठेवण्यात आलेला नाही. दोन वेळा यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. गेली दोन वर्ष अनेक वेळा पाठपुरावा करूनही महामार्गाच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणी येत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर (ओव्हर ब्रिज) किंवा सर्विस रस्ता तयार करावा अशी मागणी गेली दोन वर्ष महामार्गाचे काम सुरू असल्यापासूनच संस्थाचालक तसेच पालक व ग्रामस्थांच्यावतीने, चेअरमन, अधिकारी, पदाधिकारी करत आले आहेत. मात्र, याकडे महामार्ग दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आता संस्थेला व नागरिकांना याकडे कडक पाऊल उचलावे लागत आहे.