आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला..

आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली.या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत. तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मधून समृद्धी कुडव या ‘बिनविरोध’ निवडून आल्या आहेत.
आरवली ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी २७ उमेदवार व सागरतीर्थच्या ८ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत.आरवली ग्रा.प.साठी काँगेस,राष्ट्रवादी ६ जागा लढवित आहेत.तसेच सागरतीर्थ येथे ६ जागा लढवित आहेत.आरवली प्रभाग ३ मध्ये आघाडीने आपले उमेदवार उभे न करता मित्रपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना दोन्ही ग्रा.प.मध्ये सर्वच्या सर्व ९ – ९ जागा लढवित आहे.भाजपाने आरवली ग्रा.प.च्या ९ जागा भाजपा लढवित आहे.तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. दरम्यान दोन्ही ग्रा.प.वर आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

अभिप्राय द्या..