होय ..! कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला

होय ..! कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला

  • काँग्रेस नेते सुशील राणे यांचा दावा


काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला होता.कारण हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे.आता या आघाडीत शिवसेना पक्ष सामील होऊन महाविकास आघाडी झाली तरी कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघ काँग्रेस पक्षाकडेच कायम राहणार असा दावा काँग्रेस पक्षाचे नेते तथा २०१९ चे उमेदवार आणि माजी आमदार कै. दादा राणे यांचे चिरंजीव सुशील राणे यांनी केला आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे एका कार्यक्रमात कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असेल त्या अनुषणगाने भाजपा पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील निवडणुकांची तयारी करावी असे आवाहन केले होते.याबाबत सुशील राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले होय.! कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा कायमचा मतदार संघ आहे.यापूर्वी कै. अमृतराव उर्फ दादा राणे, कै. केशवराव राणे या मतदार संघातून निवडून आले.आमदार नितेश राणे सुद्धा २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचा पारंपारीक मतदार आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला हा मतदारसंघ भविष्यात येणार आहे. असा विश्वास सुशील राणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना महाविकास आघाडीत येण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या वाट्याला सावंतवाडी तर कुडाळ,कणकवली काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेले मतदार संघ आहेत.कुडाळ मध्ये शिवसेना विजेता असल्याने काँग्रेसने त्या जागेवर दावा केला नाही तरी कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघ काँग्रेसच्या हात या निशाणीवरच निवडणूक लढवेल,असे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..