आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे

कुळकरवाडी रस्ता,क्षेत्रफळ रस्ता, शांतादुर्गा मंदिर सुशोभीकरण कामांना कार्यारंभ आदेश कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे वडाचापाट ग्रामपंचायतीचे शिवसेना सरपंच उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ यांनी केलेल्या मागणीनुसार वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे मंजूर झाली आहेत.या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. यामध्ये २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत वडाचापाट बौद्धवाडी पाटकरवाडी, कुळकरवाडी ते लिलाकाप जाणारा रस्ता निधी ५ लाख, वडाचापाट नवपाटवाडी क्षेत्रफळ रस्ता निधी ५ लाख,तर क वर्ग पर्यटन मधून वडाचापाट शांतादुर्गा मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ५ लाखाचा निधी देण्यात आला आहे. आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून आतापर्यंत वडाचापाट गावात ५८ लाखांची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये गणेश घाट, शांतादुर्गा मंदिर सुशोभीकरण, गावात अंतर्गत रस्ते, हायमास्ट, स्ट्रीटलाईट अशी ४३ लाखाची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. तर वरील १५ लाखाची कामे नव्याने मंजूर होऊन त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या मागणीनुसार कामे मंजूर केल्याबद्दल वडाचापाट ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..