वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले कॅम्प एरियात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम –

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले कॅम्प एरियात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम –


वेंगुर्ला –
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आज वेंगुर्ले कॅम्प एरियात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर,धर्मराज कांबळी,प्रशांत आपटे,स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,पंकज केळुसकर,सागर चौधरी,निशा आळवे, आदींसह न.प.सवर्ग अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. यावेळी कॅम्प स्टेडियम एरिया,पॉवर हाऊस नजीक,घोडेबाव गार्डन,शिवाजी प्रागतिक शाळा नजीक आदी भागात हे अभियान राबविण्यात आले.

अभिप्राय द्या..