भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे येथे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र …..

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे येथे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र …..

संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने भेट..
मालवण /
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे प्रशालेत विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा स्कुल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी शाळांचे नववी व दहावी वर्ग सुरू झाले आहेत. मात्र शाळेत विध्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची तापमान तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याबरोबर मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छता हे खबरदारी नियम बंधनकारक आहेत. भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तापमान तपासणी व हात स्वच्छता एकाच वेळी व्हावी या उद्देशाने अद्ययावत असे स्वयंचलित तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने प्रशालेस भेट देण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत, शिक्षक किशोर देऊलकर, रेश्मा बोरकर, पार्वती कोदे, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, रंजनी सावंत, सायली म्हाडगूत, गौतमी प्रभुगावकर यासह शिक्षकेतर कर्मचारी वसंत प्रभुगावकर, समीर सावंत व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.

अभिप्राय द्या..