वैभववाडी/-
आ. नितेश राणे यांनी वैभववाडीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. नेर्ले सुतारवाडी येथील 42 शिवसैनिकांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यात ग्रा. पं. सदस्य यांचाही समावेश आहे. नेर्ले येथे रस्ता विकास कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. नितेश राणे यांनी ग्रामस्थांचे प्रलंबित समस्या जाणून घेतल्या. गावातील प्रलंबित विकास कामे व मोबाईल टॉवरचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ. नितेश राणे यांनी दिले आहे.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी उपसभापती अप्पासाहेब खानविलकर, पं. स. उपसभापती दुर्वा खानविलकर, शक्ती केंद्रप्रमुख पप्पू इंदुलकर, स्वप्नील खानविलकर, अरविंद पांचाळ आदी उपस्थित होते.
नेर्ले सुतारवाडी येथील प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांमध्ये अरविंद पांचाळ, जगन्नाथ पांचाळ, निलांबरी पांचाळ, रवीउदय पांचाळ, सुधाकर पांचाळ, यशवंत पांचाळ, जयवंत पांचाळ, महेश पांचाळ, जयेश पांचाळ, सुरज पांचाळ, शंकर पांचाळ, विलास पांचाळ, विजय पांचाळ, दत्ताराम पांचाळ, दीपक महाडिक, सुनील पांचाळ, सुविधा पांचाळ, निर्मला पांचाळ, रेणुका पांचाळ, जानवी पांचाळ, शंकर पांचाळ, शालिनी पांचाळ, सरिता पांचाळ, विश्वनाथ पांचाळ, सुरेश पांचाळ, गजानन पांचाळ, सुवर्णा पांचाळ, अनंत पांचाळ, अनिता पांचाळ, वैशाली पांचाळ, सविता पांचाळ, नीलम पांचाळ, रुपेश पांचाळ, सतीश पांचाळ, रमाकांत पांचाळ, गिरीश पांचाळ, सानिका पांचाळ, निलेश पांचाळ, प्रशांत पांचाळ, गणेश पांचाळ, प्रेरणा पांचाळ, तेजस्विनी पांचाळ यांचा समावेश आहे. भाजपा कार्यकर्ते स्वप्नील खानविलकर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.