वैभववाडी /-
गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात गुरव जोडो व जनगणना अभियानाची सुरुवात वैभववाडी तालुक्यातुन बुधवार दि 23/12/2020 रोजी सकाळी 10 वाजता अंकित मेडिकल वैभववाडी येथील श्री संजय सावंत- गुरव यांच्या निवासस्थानी करणेत येणार आहे.अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष श्री अँड.आण्णासाहेब शिंदे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करणेत येणार आहे.तरी सिधुदुर्ग जिल्ह्यातील गुरव समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी व गुरव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज संघटित करणेसाठी योगदान दयावे. असे आवाहन गुरव ज्ञाती बांधव समाज सिधुदुर्ग अध्यक्ष श्री संजय सावंत – गुरव व युवक अध्यक्ष श्री सदाशिव (राजू) गुरव यानी केले आहे