सुगंधा च्या कार्याने समाजाचे नावलौकिक भर

सुगंधा च्या कार्याने समाजाचे नावलौकिक भर

 

आचरा-

हिंदळे सारख्या ग्रामिण भागातील असूनही महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान मिळविणारया सुगंधा घाडीचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे.तीच्या कार्याने घाडी समाजाच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे उदगार क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष सुर्यकांत घाडीगांवकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आचरा देवूळवाडी येथे आयोजित सुगंधा घाडी हिच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत घाडीगांवकर सेवा समाज मंडळाचे विजय गांवकर , सदानंद घाडीगांवकर, विजय घाडी,विलास गांवकर, प्रदिप घाडी, सूर्यकांत घाडी गांवकर, रघुवीर वायंगणकर, लक्ष्मण घाडी गांवकर, सुनिल गांवकर,बुधाजी घाडीगांवकर उमेश घाडी , अर्जून बापर्डेकर, आचरा येथील मुकुंद घाडी, मोहन घाडी, सदानंद घाडी,अजित घाडी,ग्रा प सदस्य लवू घाडी, नितीन घाडी,उत्तम घाडी, चंदू घाडी,भाऊ घाडी यांसह अन्य घाडी गांवकर ज्ञातीबांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय गांवकर यांनी सुगंधाचे कार्य नविन पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे मत व्यक्त करत समाजातील मुलींनी तीच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तृत्वाने समाजाला नावलौकिक मिळवून देण्याचे आवाहन केले. या वेळी घाडीगांवकर दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले गेले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आचरा देवूळवाडी येथील घाडी बांधवांनी विशेष प्रयत्न केले.

अभिप्राय द्या..