कुडाळ तालुक्यातील ८०वर्ष्याच्या आजीने सर केला चार तासात रांगणा गड!

कुडाळ तालुक्यातील ८०वर्ष्याच्या आजीने सर केला चार तासात रांगणा गड!

कुडाळ /

कुडाळ तालुक्यातील रांगणा गड हा एक प्रसिद्ध रांगणा गड आहे याची ख्याती सिंधुदुर्गातच नव्हे तर, ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. रांगणागड हा प्रसिद्ध आहे.या रांगणा गडावर खुप दूर..दूर..वरून पर्यटक तसेच रांगणा गडप्रेमी हे येत जात असतात आणि या रांगणा गडाची शोभा वाढवत… असतात त्यात काल ,कुडाळ तालुक्यातील एका आजीने संपूर्ण रांगणागड चढून तो गड परत उतरली.. पण, सहीसलामत, त्या आजीचे नाव आहे. लक्ष्मी विष्णू पालव,ही आजी कुडाळ तालुक्यातील आहे.या आजीचे गाव निवजे,घावनाळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या या आजी आहेत,या आजीचे वय सध्या 80 वर्ष एवढे आहे. या आजीने आपल्या मूल,नातवंडे,पतवंडे यांच्यासोबत काल रविवारी सकाळी आठ वाजता रांगणागड सर केला.आणि रांगणा गडावर गेल्यानंतर त्या गडावर मौज मस्ती आपल्या फॅमिली सोबत करून पुन्हा ही 80 वर्षांची आजीबाई ही आपल्या फॅमिली सोबत 4 तासात रांगणा गड चढली,,,आणि पुन्हा 4 तासात गड उतरली…अश्या या 80 वर्ष्याच्या आजी बाईचा सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

अभिप्राय द्या..