कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया..

कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया..

 

कुडाळ शहरात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.सदर काम करताना कोणतीही दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही.शिवाजीनगर येथे काम करत असताना तेथील पाण्याची मेन पाइपलाइन फोडली त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.तसेच तेथील लोकांना पाण्याची गैरसोय झाली आहे.हे समजतास याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा कुडाळ तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय भोगटे यांनी घटनास्थळी धाव घेत याठिकाणी जावून तेथील लोकाना पाण्याची ही संबधित ठेकेदाराला करायला लावली.

या अगोदर दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथेच पाण्याचे कनेक्शन त्याच ठेकेदाराने तोडले त्यावेळी सुद्धा पाणी वाहून फुकट गेले होते.तसेच दहा दिवसांपूर्वी पंचायत समिती समोरील पाण्याची मेन पाइपलाइन फोडलेली होती आणि हजारो लिटर पाणी वाया गेले होते.रस्ता खोदून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करताना पाण्याच्या पाइपलाइनचे सर्व पार्ट उपलब्ध करून ठेवणे आवश्यक होते.जेणेकरून लोकाना पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही.परंतु कोणतेही पार्ट उपलब्ध ठेवलेले नाही.तसेच खोदाईचे काम करत असताना सुपरवायजर, टेक्निकल माणसे, स्पेअर पार्ट, नळ कनेक्शन जोडणारी कर्मचारी उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे.ठेकेदाराच्या बेफिकीर वागण्याने याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

सदर काम करताना पाईपलाईन फुटली तर त्याच ठेकेदाराने आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करणे आवश्यक असताना सदर काम नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे.सदर गॅस पाईपलाईन टाकताना सर्व टेक्निकल माणसे तसेच सुपरवायजर जागेवर हजर पाहिजे अन्यथा काम करू दिले जाणार नाही असा ईशारा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..