मुंबई:
कोरोना महामारीमुळे एसटी प्रशासन आर्थिक अडचणीत सापडले असून कर्मचाऱ्यांचा पगार तसेच इतर वेतनाचा प्रश्न नेहमी उद्भवत आहेत.अशातच उत्पन्न वाढीसाठी व तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ नवीन उपाय योजना करत आहेत.
यातच एक उपाययोजना म्हणजे नाथजल नावाच बाटलीबंद पाणी.
अवघ्या १५ रुपयांत मिळणारे हे शुद्ध बाटलीबंद बंद पाणी लवकरच प्रवाशांची तहान भागवायला बस स्थानक आवारातील उपहारगृह,हॉटेल्स व स्टॉल वर उपलब्ध होईल.
यामुळे एसटी प्रशासनाला आर्थिक संकटातून सावरायला मदद होणार आहे.
तसेच अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विक्रीसाठी ठेवल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत.