नीडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्याकडून गौरव
कोल्हापूर
राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार नीडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. गोरगरिबांप्रती असलेली कणव, तळमळ आणि सेवेमुळे ते अजूनही खूप मोठे होतील असेही, ते म्हणाले.
गडहिग्लजला बेलबाग येथील श्री. जडेयसिद्धेश्वर आश्रमात श्री. महास्वामीजी बोलत होते. श्री. बसवेश्वर स्वामी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आश्रमाच्या इमारतीच्या कामांसह परिसर सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचे अभिवचन दिले.
यावेळी श्री. महास्वामीजी पुढे म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची सेवा आणि विधायक कामातून उभे राहिले आहे. या पुण्याईची प्रचंड शक्ती त्यांच्या पाठीशी असल्यामुळेच ते सलग पाच वेळा विजयी झाले. त्यांच्या या अफाट लोकसेवेमुळे ते जनतेला आजच्या युगातले राजर्षी शाहू महाराज वाटतात.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मानवता वादावर आधारलेल्या या धर्माचा लौकिक श्री. बसवेश्वर स्वामींच्या पाठोपाठ श्री. वीरभद्र महास्वामीजी आणि चंद्रमा माताजी यांनी केलेल्या धर्मप्रसाराच्या कार्यामुळे पिढ्यानपिढ्या वाढतच जाईल.
मुश्रीफसाहेब मुख्यमंत्री होतील!
उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे विकास कामाबरोबरच गोरगरिबांच सेवाकार्य प्रचंड आहे. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. त्यांच्या या कामामुळे भविष्यात ते मुख्यमंत्रीही होतील, असेही श्री कोरी म्हणाले.
म्हणून आम्ही सुखाने जगतोय…..
श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, भारतमातेच्या रक्षणासाठी अहोरात्र प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानामुळेच आम्ही सुखाने जगत आहोत. मातृभूमीच्या संरक्षणार्थ लढणारे आणि प्रसंगी जीव देणारे हे बहादर वीर महानच आहेत. अश्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनने केलेले मदतीचे कार्यही महानच आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम, डॉ सदानंद पाटणे, डॉ नागेश पट्टणशेट्टी, उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अमर चव्हाण, बाळेशा नाईक, हरुण सय्यद, रमजान आत्तार, अभय देसाई, ज्योत्स्ना पताडे, सोमनाथ आरबोळे, शेखर येरटी, सुनील शिंत्रे, रोहित मांडेकर, दिलीप माने, दिग्विजय कुराडे, राजेंद्र पवार, सुभाष हत्ती, सौ. उर्मिला जोशी, शुभदा पाटील, शबाना मकानदार, सुनीता नाईक, अजित बंदी, रामगोंड पाटील, सुरेश कोळकी, विजय कीतुरकर, राजेंद्र दड्डी, काडापाण्णा हंजी, नागापाण्णा कोल्हापुरे, राजेंद्र गड्याणवार, बाळासाहेब घुगरी, बसवराज आजरी आदी प्रमुख उपस्थित होते.