कुडाळ तालुक्यात आज रविवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण

कुडाळ तालुक्यात आज रविवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण

कुडाळ /

कुडाळ तालुक्यात आज रविवारी दिनाक २० डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०१ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये ओरोस मधील ०१ कोरोना रुग्ण आहे.असा एक कोरोना रुग्ण कुडाळ तालुक्यात सापडून आला आहे.कुडाळ तालुक्यात एकूण ५३३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५१५ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या १८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण १३१६ तर बरे झालेले रुग्ण १२३० आणि सक्रिय रुग्ण ४५,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..