कल्याणमद्धे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.;ह्यूमन ट्रॅफिक सेलची कारवाई..

कल्याणमद्धे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.;ह्यूमन ट्रॅफिक सेलची कारवाई..

ठाणे /-

कल्याण पूर्वेतील नांदीवली परीसरात एका इमारतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने ही कारवाई केली आह. या घरामधून चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चारही महिला बांगलादेशी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी मोहन बर्मन नामक दलालाला अटक करण्यात आली असून याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठाणे अॅन्टी ह्यूमन ट्रॅफिक सेलला याबाबत माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. नांदीवली परिसरातच या बांगलादेशी महिला राहत असल्याचं देखील समोर आलं आहे.याआधी देखील कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिला येतात. काहींना नोकरीचं आमिष दाखवून येथे आणलं जातं. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

अभिप्राय द्या..