श्रीराम वाचन मंदिरतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन.;

श्रीराम वाचन मंदिरतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन.;

सावंतवाडी

येथील श्रीराम वाचन मंदिरातर्फे निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्घेत १६ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष प्राधान्य राहणार आहे. निबंध ३० सप्टेंबरपर्यंत प्रंथपाल श्रीराम वाचन मंदिर या पत्त्यावर पाठवायचा आहे.
कोरोना नंतरचा भारत कसा असेल, लॉकडाऊन मधले माझे अनुभव, मंदिर हवीत की हॉस्पिटल्स, सार्वजनिक स्वच्छता : काळाची गरज या विषयावर साधारण २ हजार शब्द मर्यादित निबंध असावा, निबंधात वापरलेले संदर्भस्रोत निबंधाखाली नमूद करावयाचे आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ७०१ रूपये, द्वितीय क्रमांकास ६०१ रूपये व तृतीय क्रमांकास ५०१ रूपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. १६ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष प्राधान्य राहणार आहे. या स्पर्धेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर व सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..