वेंगुर्ला
देशात राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा दिवस आहे. याच दिवसापासून पक्ष संघटने बरोबरच शरद पवार यांचे हात मजुबुतीसाठी बळकटी मिळते. हि पक्ष संघटना करताना महिला व पुरूष कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास लॉटरी ठेवण्यांत आलेली असून प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटी स्थापन करून शरद पवार यांचे म्हणजे राष्ट्रवादीची पक्ष संघटना बळकट करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर यांनी उभादांडा येथील राष्ट्रवादीच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात आयोजीत कार्यक्रमांत केले.
वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँगेसच्या उभादांडा-सिध्देश्वरवाडी येथील कार्यालयात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा वाढदिवसानिमीत्त लहान मुलांकडून केक कापून या कार्यक्रमाचे प्रातिनीधीक उदघाटन झाले. यावेळी उपस्थित लहान मुलांच्या वयोगटानुसार चिठ्ठया टाकून, तसेच तर महिलांनाही चिठ्ठया टाकून विविध स्वरूपाची बक्षिसे देण्यांत आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, जिल्हा सरचिटणीस दिपक नाईक,राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अन्थोनी डिसोजा, डॉक्टरसेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा चिटणीस मकरंद परब, तालुका माजी उपाध्यक्ष बावतीस डिसोजा, युवती जिल्हाध्यक्षा निता परब, कार्याध्यक्षा संपदा तुळसकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिपक नाईक यांनी,राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्षा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज देशातील जनतेला आणखी वर्षासाठी गरजेचे आहे. तळगाळात राष्ट्रवादीची संघटना बळकट करून राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणी अभियानातून साखळी पध्दतीने जो सदस्य कार्यकर्त्याचा मिळून भकम असा हार तयार करून शरद पवारांना बळकटी द्या. कारण २४ तासापैकी १८ तास राजकारणांबरोबराबरच सर्व सामान्यांच्या हिताचा अभ्यास सदोदित करणाऱ्या पक्ष नेतृत्वाला भक्कम करण्याची खरी गरज आहे. असे स्पष्ट केले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले शहरांसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम तसेच बुथ कमिट्या स्थापन करणाऱ्या सदस्यांना लॉटरी पध्दतीने पैठणी व शर्ट-पँन्टचे वाटप यांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यांत येणार असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमांस तालुक्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्यांसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.