वेंगुर्ला
शासनाच्या “पाणी अडवा पाणी जिरवा” या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वेंगुर्ले कडून वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
दरवर्षी वेंगुर्ला ग्रामसेवक युनियन तर्फे तालुक्यात एका ओहोळावर वनराई बंधारा बांधला जातो. त्यानुसा हा वनराई बंधारा वायंगणी येथे बांधण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा पाटील, कृषीअधिकारी विद्याधर सुतार, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर, वेंगुर्ला ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष गणेश बागायतकर, सचिव प्रल्हाद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुका उपाध्यक्ष श्री अनिल चव्हाण, संचालक काळसेकर, पंचायत समिती कर्मचारी संजना करंगुटकर तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, वायंगणी सरपंच श्री सुमन कामत, ग्रामपंचायत सदस्य सतीश कामत व ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले होते.
