कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दिनाक १२ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार नव्याने पुन्हा ०५ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत.अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०२ कोरोना रुग्ण आहेत.तर आकेरी येथील ०१, बाव येथील ०१,पिंगुळी येथील ०१,असे एकूण पाच कोरोना रुग्ण मिळाले आहेत. कुडाळ तालुक्यात एकूण ५२३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४९५ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या २८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण १२७७ तर बरे झालेले रुग्ण ११६९ आणि सक्रिय रुग्ण ६७,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.