जिल्ह्यात विविध शाळांमधीलa कर्मचा-यांकडून जोरदार निदर्शने
कुडाळ /-
राज्यातील शाळेत सर्व शिक्षकेत्तरची नोकर भरती शासनाने कायमची बंद केली असून यापुढे फक्त पाच हजार इतक्या मानधन तत्वावर कंत्राटी शिपाई नेमणार असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी ११डिसेंबर रोजी शिक्षण विभागाने घेतला आहे.याचे सर्व स्तरातून पडसाद उमटू लागले असुन आज सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने शासनाच्या या अन्यायकारक शासन निर्णयाचा निषेध करीत या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी कुडाळबरोरच जिल्हाभर या शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील ठिकठिकाणी विविध विद्यालयातील शिक्षकांनी या शासन निर्णयाची होळी करून हा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.