सिंधुदुर्गात सापडले २६ कोरोना रुग्ण.;तर रत्नागिरीत आज सापडले केवळ २ नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण..

सिंधुदुर्गात सापडले २६ कोरोना रुग्ण.;तर रत्नागिरीत आज सापडले केवळ २ नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. काल शुक्रवारी.३९ रुग्ण आढळल्यानंतर आज जिल्ह्यात जिल्ह्यात २६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावरील मालवण शहर पुन्हा एकदा कोरोना बाधित झाले आहे. शहरातील सोमवार पेठेतील एका कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या बँक कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. तर ग्रामीण भागात एका आंबा व्यायसायिकाला कोरोना झाला आहे.

रत्नागिरी कोरोना अपडेट्स

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडले केवळ २ नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात आज २ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९५२वर पोहोचली आहे. आज ३३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८४७९वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आज शनिवारी (दि. १२) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

आरटीपीसीआर

▪️रत्नागिरी १
एकूण १

अँटीजेन

▪️खेड १
एकूण १

अभिप्राय द्या..