मालवण /-
मालवणस सात गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दि. २ डिसेंबर रोजी होत आहे.गिरोबा हे देवस्थान मुळ नांदरुखसह मालवण, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ आणि कातवड अशा सात गावांची ग्रामदेवता आहे. वस्ती पासून दूर असलेल्या या मंदिराच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या कालखंडात मोठी बाजारपेठ होती, असा इतिहास आहे. मंदिराच्या उजवीकडे असलेल्या तळीमध्ये आणि मागिल तलावामध्ये वर्षाचे बारा महिने मुबलक पाणी असते.जत्रोत्सवाच्या रात्री नऊ वाजता पलिकडिल वाडीतून वाजत गाजत पालखीचे आगमन होते. फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रोत्सवाच खास आकर्षण असते. धार्मिक विधीनंतर वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक होते.