कुडाळ /-
आज शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या सर्व मागण्यान बाबत निवेदन देत शासन दरबारी लक्ष वेधले आहे.यावेळी तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे शहरातील व्यापारी,तसेच ग्रामीण भागातील व्यापारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुडाळ तालुका ध्यक्ष संजय भोगटे सेक्रेटरी अवधूत शिरसाट,खजिनदार अनुप तेली,पी.डी.शिरसाट संदेश पडते द्वारकानाथ गुर्ये प्रकाश कुंटे राजन नाईक श्रीराम शिरसाट जाफर जमादार दिपक गावडे पप्पू शिरसाट बबलू मळेकर राकेश वर्दम भाऊ राऊळ बबन घुर्ये सुनिल कुडाळकर,दशरथ राऊळ,तसेचकुडाळ,पणदूर,माणगाव,ओरोस,कसाल, पाट, कडावल,या भागातील व्यापारी वर्ग उपस्थित होते.कसाल येथून उमेश पावसकर ,नवीन बांदेकर, ओरोस येथून आमडोसकर ,पणदूर येथून राजेश टंगसाळी ,कडावल येथून दिलिप सावंत , माणगांव येथून बाळा कोरगांवकर मोहन नानचे जुवेकर नाना बोगार ,पिंगुळी येथून सुनिल म्हापसेकर ,पाट येथून धनुर्धर शिरसाट
नेरूर भांडारकर उपस्थितीत होते.