कुडाळमधील पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत

कुडाळमधील पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण..

कुडाळ /-

अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुकयात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत प्रत्येकी ४ लाख रु ची आर्थिक मदत करण्यात आली आहे.कुडाळ तहसील कार्यालयात बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत केरवडे येथील गणेश कुंभार व इसप्रान्स लोबो, तसेच नेरूर येथील अश्विनी मडवळ, या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रु ची आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.आ. वैभव नाईक यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, जि.प.सदस्य राजू कविटकर, उपसभापती जयभारत पालव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी जि.प. सदस्य संजय भोगटे, रूपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळप, न.पं.गटनेते बाळा वेंगुर्लेकर, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,शैलेश घाटकर, राजू गवंडे, मितेश वालावलकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..