संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /-

देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस तालुकाध्यक्ष श्री. विनायक जाधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. सदर वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कणकवलीचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने ऊपस्थित होते. तसेच शिक्षक भारती संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष श्री. दशरथ शिंगारे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव श्री. दिपक तेंडूलकर, सहसचिव श्री. अमित चव्हाण इ. पदाधिकारी उपस्थित होते.
सदर भेटीवेळी तालुकाध्यक्ष श्री. विनायक जाधव यांनी निवेदन दिल्यानंतर प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांना संपातील विविध मागण्यांबाबत अवगत केले. तसेच सदरवेळी बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना आभार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक नेते श्री. गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष श्री. विनायक जाधव, तालुका सरचिटणीस श्री. सुशांत मर्गज कार्याध्यक्ष श्री. राजेंद्रप्रसाद मणेरीकर, कोषाध्यक्ष श्री. संतोष राणे, शिक्षक पतपेढी संचालक श्री. आनंद तांबे, जिल्हा कार्यालय चिटणीस श्री. संतोष कुडाळकर, माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण कांबळी, उपाध्यक्ष श्री. टोनी म्हापसेकर, विभाग उपाध्यक्ष श्री. संदीप तांबे, सल्लागार, राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. प्रदीप मांजरेकर, श्री. शिवाजी मडव, तालुका कार्यालयीन चिटणीस श्री. महेश चव्हाण, तालुका संपर्कप्रमुख श्री. प्रशांत बोभाटे, जेष्ठ सदस्य श्री. संदिप गोसावी, श्री. सदानंद ठाकूर, महिला सदस्या श्रीम. सुप्रिया म्हसकर, श्री. सुनील कदम. श्री. श्रीकृष्ण ठाणेकर, श्री. प्रकाश बुचडे, श्री. गौतम जाधव, श्री. सुनील गावकर श्री. सदानंद गावकर, श्री. मदनकुमार नारागुडे, श्री. संजय कोळी, श्रीम. कल्पना सावंत, श्रीम. दिपीका चव्हाण इ. पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..