मसुरे/-
बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री संपूर्ण मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा झाल्या नंतर चेंदवनकर – गोरे दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. भाविकांनी कोरोना संदर्भातील सर्व निर्देश पाळून उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस गावकरी मंडळींनी केले आहे.