मसुरे/-
बिळवस येथील स्व. गोपी पालव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना माजी तालुकाप्रमुख स्व. गोपी पालव यांच्या जयंती निमित्त बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित कै हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र, बिळवस येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक पालव, सूर्यकांत पालव, पोलीस पाटील गोविंद सावंत, रोहन पालव, रोहित पालव, गणेश पालव, किशोर पालव, प्रथमेश पालव, सिद्धेश पालव, प्रसाद आंगणे, वैभव पालव, प्रवीण पालव, शार्दूल पालव, सागर पालव, संचित पालव आदी उपस्थित होते.