सुप्रसिद्ध भजनीबुवा विशाल मसुरकर याना पितृ शोक..

सुप्रसिद्ध भजनीबुवा विशाल मसुरकर याना पितृ शोक..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी येथील जेष्ठ भजनी बुवा गोविंद यशवंत मसुरकर (७५ वर्षे) यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांनी मुंबई पोलीस दलात २० वर्ष सेवा बजावली होती. सेवेत असतानाही भजनाची आवड त्यांनी जपली होती.

भजनसम्राट कोकणला भूषण बुवा चंद्रकांत कदम यांच्याकडे त्यांनी भजनाचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी बांदिवडे येथे वास्तव्यास आले. दिलखुलास स्वभावामुळे ते लोकप्रिय होते.मुंबई सह कोकणातील सुप्रसिद्ध भजनी बुवा विशाल मसुरकर यांचे ते वडील तर पोलीस पाटील नरेश मसुरकर यांचे चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..