मसुरेत भाजप कडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन..

मसुरेत भाजप कडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन..

मसुरे /-

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची व त्यांनी दिलेल्या मुल मंत्रांचे आपण सर्वांनी पालन केले तर ती खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते आणि भारतीय जनता पक्ष डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदू दादा परब यांनी मसुरे येथे केले.
मसुरे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आणि युवा नेते नंदू दादा परब यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी मसुरे जिल्हा परिषद सदस्य सौ सरोज परब आणि भारतीय जनता पार्टी मालवण तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा व त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ सरोज परब, मालवण तालुका महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी पेडणेकर, घनश्याम परब, शिवाजी परब, बंटी गोसावी, अभिजीत दुखंडे, दादू मेस्त्री, श्रीमती दुखंडे मॅडम, तसेच भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..