वेंगुर्ला /-
भारतीय जनता पार्टी ,वेंगुर्लेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आधार काठी भेट देऊन जयंती साजरी करण्यात आली.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर यांच्या हस्ते पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले शहरातील विनायक नारायण जोशी, सुरेश लक्ष्मण घाडी, गोपाळ सावंत, मधुकर मेस्त्री, अनंत भिकाजी राऊत, अनिल दत्ताराम नाईक या सहा दिव्यांगासाठी आधार काठी भेट देण्यात आली.यावेळी पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या विषयी विचार मांडताना बागलकर म्हणाले की, पं.दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले विचार भाजपा साठी मार्गदर्शक आहेत.पं. दिनदयाळजींनी मांडलेले ” एकात्म मानव दर्शन ” भाजपाने १९८५ साली आपली विचारधारा म्हणून स्वीकारली.जनतेने देशाचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी भाजपा वर सोपवली आहे.अशा वेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे विचार पक्षासाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत यावेळी बीजेपी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले न. प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,नगरसेवक प्रशांत आपटे,महिला तालुका अध्यक्षा तथा माजी उपसभापती स्मिता दामले, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, सोमनाथ टोमके, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर,मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष दशरथ गडेकर, रविंद्र शिरसाट, तुळस सरपंच शंकर घारे, संदीप पाटील, राहुल मोर्डेकर, निलय नाईक , शरद मेस्त्री,महेंद्र घाडी , संतोष साळगांवकर, प्रकाश धावडे आदी उपस्थित होते.