कुडाळ भाजपाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी..

कुडाळ भाजपाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी..

कुडाळ /-

एकात्म मानवता वादाचे प्रणेते, महान तत्त्वचिंतक, अर्थतज्ञ, कुशल संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ मध्यवर्ती कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष श्री. विनायक राणे, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस आणि पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती समोरोहाचे संयोजक श्री. बंड्या सावंत, कुडाळ शहर शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष विलास वराडकर, निलेश परब, वैभव परब, योगेश घाडी आदी उपस्थित होते. यावेळी मा. श्री. राजू राऊळ व श्री. निलेश तेंडुलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुडाळ शहर मंडळ मध्ये सर्व बुथवर जयंती साजरी करून पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार समजून आत्मसात करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री विनायक राणे यांनी केले.

अभिप्राय द्या..