मसुरे /-

सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवण्यात सावंत सर यांचा हातखंडा होता. सावंत सर यांच्या बद्दलच्या आदर युक्त भीती मुळे चांगला अभ्यास करून विविध क्षेत्रात त्यांचे विध्यार्थी चमकत आहेत. सरांच्या निधनाने एक चांगला वक्ता, आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, तसेच चांगल्या कलाकारांस आपण मुकलो आहोत. त्यांचे योगदान आम्हाला पुढील काळात मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य तथा मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांनी येथे केले.
मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक कृष्णाजी उर्फ के. बी. सावंत सर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हायस्कुलच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्था, शाळा, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
गावामध्ये नाट्य कलाकार निर्माण होण्यासाठी मोठे योगदान सावंत सर यांनी दिले. नोकरीच्या सुरवातीच्या काळात अल्प वेतनावर काम करत संस्थेला मोठा आधार सावंत सर यांनी दिला. येथील अनेक मंडळांना त्यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ वाढण्यास मदत झाली. अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप मालवण महिला तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, माजी उपसरपंच अशोक बागवे, मुंबई कमिटी सदस्य सुरेश बागवे, बागवे हाय मुख्याध्यापक आर. डी. किल्लेदार, संस्था पदाधिकारी विठ्ठल लाकम, अर्चना कोदे, भरत ठाकूर, भाऊ बागवे, सदस्य श्री राणे , पंढरीनाथ नाचणकर, प्रभारी मुख्या. कांबळे सर, सुधाकर बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विलास मेस्त्री, श्रीकांत सावंत, श्री परब, भानुदास परब, रमेश पाताडे, सौ. मसुरकर, आपा सावंत, अनिल मेस्त्री, एस. डी. बांदेकर, डी. पी. पेडणेकर, शशांक पिंगुळकर, श्रीमती सावंत, तसेच ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्था चिटणीस जे. डी. बागवे यांचा शोक संदेश तसेच सावंत सर यांचे सुपुत्र उद्योजक दीपक सावंत यांनी पाठविलेले संदेश वाचन करण्यात आले. प्रास्तविक व आभार विठ्ठल लाकम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page