मसुरे /_

सध्या सर्वच क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक सुसंवादाच्या प्रक्रियेत कमालीचे अंतर निर्माण होत आहे.हे लक्षात घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या कार्याला एक सांस्कृतिक उभारी मिळावी आणि ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने वयोगट ८ ते १६ वर्षापर्यंतच्या गायनकलेची विशेष आवड असलेल्या विद्यार्थी कलावंतांसाठी ऑनलाईन मंच उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वैयक्तिक गीतगायन स्पर्धा अर्थात दर्पण लिटील चॅम्प्स-२०२०
स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेची ही प्राथमिक फेरी असून स्पर्धकांनी आपल्या गायनाचा संगीतबद्ध व्हिडिओ तयार करून पाठवण्याचे आवाहन संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक तथा विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम आणि स्पर्धा प्रमुख सुधीर तांबे यांनी केले आहे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही जिल्ह्यातील एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत कार्यरत असणारी आंबेडकरी विचारधारा जपणारी दर्पण ही संस्था असून कोरोनाच्या काळात या संस्थेनेही कणकवली परिसरातील आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आणि जे कोरोना योद्धा म्हणून काम करताहेत अशा सुमारे शंभर कर्मचार्‍यांना उत्तम पवार स्मृती संकल्प दिनानिमित्त मास्क आणि सॉनिटायझरचे मोफत वितरण करून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ८ते १६वयोगटातील स्पर्धकांनी मराठी किंवा हिंदी गीतांपैकी कोणत्याही एका गीताचा फक्त अंतरा आणि मुखडा तसेच आंबेडकरी चळवळीवर आधारित बुद्ध /भिमगीतांपैकी कोणत्याही एका गीताचा अंतरा आणि मुखडा.अशा दोन गीतांचे गायन करणे अपेक्षित आहे
तसेच स्पर्धकांनी स्वतःच्या संगीत वाद्यवृंदाच्या साथीने अथवा कराओकेच्या सहाय्याने गायन करून त्याचा लाइव्ह व्हिडिओ तयार करून 9049813616 या व्हाट्सएप नंबरवर अथवा vishalhdkr@gmail.com ईमेलवर पाठवावा .
व्हिडिओमध्ये स्पर्धकांनी स्वतःचे नाव, वय, पत्ता आणि दर्पण लिटील चॅम्प्स साठी आपण सहभागी होत असल्याचा उल्लेख सुरुवातीला करणे आवश्यक आहे
स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून शाळेचे ओळखपत्र अथवा आधारकार्डाचा फोटो सोबत पाठवावा
गायनाचा व्हिडिओ आडवा (Landscape mode) चित्रीत करणे आवश्यक आहे
सदर व्हिडिओ किमान ३मिनिटांचा अथवा कमाल ७ मिनिटांचा असावा. दोन्ही गाण्यांचा एकच सलग व्हिडिओ असावा. कोणत्याही प्रकारे एडिट केलेला अथवा अन्य लोगो वाॅटरमार्क आढळल्यास तो स्पर्धेतून बाद केला जाईल.अशा नियम व अटींचे पालन करून स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या प्राथमिक फेरीतील सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्तम १२ स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.हा महाअंतिम सोहळा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. महाअंतिम स्पर्धेत विजेत्या दर्पण लिटील चॅम्प्ससाठी खालील प्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रथम-४०००/-,द्वितीय-३०००/-तृतीय-२०००/-आणि उत्तेजनार्थ २-प्रत्येकी १०००/-
आणि आकर्षक सन्मानचिन्हे.
व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर २०२० आहे.वरील स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 9975405229 8668250843 ,9689144628 या नंबर वर संपर्क साधा. गायनक्षेत्राची आवड असणार्‍यांना ८ते १६ वयोगटातील स्पर्धकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दर्पण प्रबोधिनीचे प्रमुख कार्यवाह आनंद तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page