You are currently viewing वेंगुर्ले शिवसेनेतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी.

वेंगुर्ले शिवसेनेतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी.

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने आज मंगळवारी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना, अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, ओझोन मेडिकेअर सर्व्हिसेस व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये एकूण १७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उदघाटन शिवसेना महिला जिल्हा समन्वयक रुची राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.तसेच शिवप्रतिमेस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, वेंगुर्लेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.डी. वजराटकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, वेदांग पेडणेकर,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर,कार्मिस आल्मेडा, दिलीप राणे, गजानन गोलतकर,अभिनय मांजरेकर, हेमंत मलबारी,डेलिन डिसोजा, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गृहिता राव व डॉ. स्वप्नाली पवार,अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर चे सिनियर मेडिकल ऑफिसर राहुल चौगुले व ओमकार दळवी,उभादांडा विभाग संघटिका सावली आडारकर,उपविभाग संघटिका टीना आलमेडा, उपशहर संघटिका कोमल सरमळकर,खानोली ग्रा.पं. सदस्या प्रतिभा खानोलकर,उपजिल्हा रुग्णालयाच्या पी.एफ.डिसोजा, सावली वेंगुर्लेकर,नेहा पडते आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अतुल मुळे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रुची राऊत यांच्या हस्ते डॉ.पी. डी. वजराटकर, डॉ. गृहिता राव, डॉ. ओमकार दळवी, डॉ. स्वप्नाली पवार, डॉ राहुल चौगुले,डॉ. श्रीनिवास बेळणेकर यांचा सन्मान करण्यात आला.रुची राऊत यांचे यशवंत परब यांनी स्वागत केले.खासदार विनायक राऊत यांनी जनतेसाठी भरीव कार्य केले असून त्यामुळेच ते लोकप्रिय खासदार बनले आहेत,असे यशवंत परब यांनी सांगितले.उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक,सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..