You are currently viewing मठ श्री स्वयंमेश्वर सोसायटीच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार

मठ श्री स्वयंमेश्वर सोसायटीच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार

वेंगुर्ला /-


मठ श्री स्वयंमेश्वर
सोसायटीच्या येथील लोकांना आपले कायम सहकार्य राहील. लोकांना व्यवसायास चालना मिळेल, बेकार लोक व्यवसाय करून उदरनिर्वाह करतील या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना कर्ज द्या, सर्वांना आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी मठ येथे केले.मठ श्री स्वयंमेश्वर
सोसायटी येथे मनिष दळवी यांनी भेट दिली.यावेळी संस्थेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.यावेळी नूतन चेअरमन सुभाष बोवलेकर
व व्हाईस चेअरमन सिताराम गावडे यांचा मनीष दळवी यांनी सन्मान केला.यावेळी संचालक देवेंद्र गावडे, गुंडू ठाकूर,कानू गावडे, शंकर गावडे,यशवंत नाईक, दत्ताराम होडावडेकर, उमेश नाईक, सुभाष मठकर, संध्या वालावलकर, सुखदा ठाकूर, विद्याधर कडुलकर,तसेच संस्थेचे सचिव जयदेव फडतरे, सेल्समन गजानन मांजरेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..