You are currently viewing कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील बसविण्यात आलेल्या हायमास्टचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते उदघाटन.

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील बसविण्यात आलेल्या हायमास्टचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते उदघाटन.

कणकवली /

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवल येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे बसविण्यात आलेल्या हायमास्ट विद्युतीकरणाचे उद्घाटन करताना जिल्हा अध्यक्ष अमित सामंत
कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवल येथील श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री,प्रफुल्ल सुद्रीक यांच्या स्वनीधी फंडातून ३ लाख रुपये खर्च करून हायमास्ट विद्युत पुरवठा करण्यात आला, यांचे श्रीफळ वाढवून व फित कापून बाळ कनयाळकर यांनी शुभारंभ केला व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी हायमास्ट स्वीच चालू करून उद्घाटन केले, त्यामुळे शिरवलसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांकडून प्रफुल्ल सुद्रीक यांचे अभिनंदन होत असून, यापुढे शिरवल गावच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहून प्रलंबित असलेल्या विकास कामांचा शिरवल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आपल्या जवळ पाठपुरावा केल्यास सर्वतोपरी विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल,यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर,प्रांतीक सदस्य तथा जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,शिरवल ग्रामपंचायत सरपंच व सदस्य,कळसुली ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, देवस्थानचे प्रमुख मानकरी,व महिला, पुरूष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

अभिप्राय द्या..