You are currently viewing कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा रस्ता नुतनीकरणाचा संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ.;पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला रस्ता.

कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा रस्ता नुतनीकरणाचा संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ.;पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला रस्ता.

कणकवली /-

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा प्रजिमा क्रमांक ८ या रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी शिवसेना पदाधिकारयांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. व सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. गेली काही वर्षे हा रस्ता खड्डेमय असल्याने नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागला होता. मात्र रस्ता नुतनीकरणास निधी मंजूर झाल्याने स्थानिक व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी शुभारंभ प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक नीलम सावंत पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख बाबूभाई पेडणेकर, उपविभागप्रमुख विजय धुरी, संजय पारकर, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, युवासेना उपविभागप्रमुख केतन सावंत, शाखाप्रमुख विजय भोगले, महादेव सकपाळ, गणपत कुडतरकर, सागर गोरुले, महादेव चव्हाण, अरुण सावंत, संजय भोवड, दादा घाडी, दिगंबर गुरव, अजय परब, माया परब आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२०-२१ अंतर्गत मंजूर झाला असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगात आभार व्यक्त केले.

अभिप्राय द्या..