You are currently viewing सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक तसेच वंचित समाज उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक तसेच वंचित समाज उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ला /-


सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शरद कृषी भवन ओरोस येथे उद्योजकांना केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयांतील योजना यांचे मार्गदर्शन करणार आहेत. नवीन नावीन्यपूर्ण उद्योगांची ओळखही या वेळी देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना सुवर्णसंधी आहे.आवश्यक असणारी आधुनिक टेक्नॉलॉजी, अर्थपुरवठा, केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडी यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of Micro, Small & Medium Enterprises) तज्ञ मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन त्यांच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत.तसेच ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्यती मदत करणार आहेत.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.
तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून दिनांक २६ फेब्रुवारी रोजी प्रहार भवन कणकवली, सिंधुदुर्ग येथे सकाळी १० ते सायंकाळी ३ पर्यंत वंचित समाजाच्या(SC, ST) उद्योजकांचा विकास कार्यक्रम व केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी नवीन नाविन्यपूर्ण उद्योगांची ओळख,
कॉयर बोर्ड ( नारळापासुन बनवण्याच्या वस्तु) यांचे प्रदर्शन,गोवा शिपयार्ड, कोकण रेल्वे, सर्व नॅशनल बँक, वंचित समाजाला उद्योगांसाठी मार्गदर्शन स्टॉल,आधार उद्योग नोंदणी मार्गदर्शन,वंचित समाजातील उदयोजकांनी उत्पादित केलेला माल शासन खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन,
शासकीय ठेक्यामध्ये ३० टक्के आरक्षणाबाबत माहिती,शासनाच्या उद्योग योजनेची माहिती, उद्योगाला अर्थपुरवठा व सबसिडी यांची माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात उद्योजक, ठेकेदार, सेवा देणारे उद्योजक, नवीन उद्योग सुरु करणारे उद्योजक, कारागीर सहभागी होऊ शकतात.कार्यक्रमाला येताना उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र घेऊन यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..