You are currently viewing गोट्या सावंत याना सशर्त जामीन मंजूर चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवली तालुका बंदी

गोट्या सावंत याना सशर्त जामीन मंजूर चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवली तालुका बंदी

सिंधुदुर्गनगरी /-

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. बचाव पक्षाच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ऑनलाईन बाजू मांडली होती. न्यायालयाने आज यावर निर्णय दिला. न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात जाण्यास बंदी घातली आहे. तसेच दर सोमवारी ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे.

अभिप्राय द्या..