You are currently viewing जल जीवन मिशन प्रकल्पातर्गत जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणार.;जि. प.अध्यक्षा संजना

जल जीवन मिशन प्रकल्पातर्गत जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणार.;जि. प.अध्यक्षा संजना

सिंधुदुर्गनगरी /-

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून  देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या(फिल्ड टेस्ट किटच्या) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येणार आहे.विशेषतः स्थानिक महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यासाठी २३ रोजी एकाचदिवशी ५९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत स्‍तरावर गावनिहाय पाणी गुणवत्‍ता तपासणीकरिता प्रति महसुली गावं 5 महिलांचे जैविक फिल्ड टेस्ट किट H2S व्हायलसबाबत प्रशिक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. प्रशिक्षित महिलांव्‍दारे २३ फेब्रुवारी  2022 रोजी  एकाच दिवशी  अभियान स्वरुपात जिल्ह्यातील एकूण ४३१ ग्रामपंचायतीमधील ७४१ महसुली गावातील ५९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक FTK- H2S व्हायलस वापरुन तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात साथरोग प्रतिबंध आणि निवारणाच्या दृष्टीकोनातून पाणी नमुन्याची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक,जलसुरक्षक आणि प्रशिक्षित महिलांनी सदर दिवशी योग्य नियोजन करून जैविक FTK- H2S व्हायलसद्वारे पाणी तपासणीसाठी सहभाग घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्षा सौ सावंत यांनी केले आहे.

जैविक फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणीमध्ये स्त्रोताचे २० मि.ली पाणी दिलेल्या व्हायलसमध्ये मार्कपर्यत भरून २४ तास ठेवण्यात येणार आहे. २४ तासानंतर जर त्या पाण्याचा रंग बदल्यास किंवा काळा झाल्यास सदर पाणी पिण्यास अयोग्य असणार आहे. त्‍वरीत सदर स्‍त्रोतांचे मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामपंचायतच्‍या जलसुरक्षकाने टी.सी.एल. पावडरद्वारे शुध्दिकरण करुन पाणी नमुना प्रयोगशाळेत जैविक तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.

महसुली गावनिहाय केंद्र शासनाच्या WQMIS संकेतस्थळावर सदर जैविक पाणी नमुने तपासणीचे निष्कर्ष फोटोसहीत नोंद करण्यात येणार आहेत, असेही सौ सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा