You are currently viewing शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन अखेर दहाव्या दिवशी स्थगित.;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पुर्ततेबाबत दिले लेखी आश्वासन.

शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन अखेर दहाव्या दिवशी स्थगित.;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पुर्ततेबाबत दिले लेखी आश्वासन.

सिंधुदुर्गनगरी /-

आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर १४ फेब्रुवारी पासून सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज दहाव्या दिवशी मुख़्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सकारात्मक भूमिका घेत काही स्थानिक पातळीवरील मागण्याबाबत आठ दिवसात पूर्तता केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी आज १४ फेब्रुवारी रोजी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते.
प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडत आपल्या मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

अभिप्राय द्या..